मुंबई – शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादात अडकल्याचे पाहायला मिळते. त्यातच आता त्यानी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराशी केवळ टिकली लावली नाही म्हणून बोलण्यास नकार दिल्याचा प्रकार बुधवारी मंत्रालयामध्ये घडला. या प्रकरणाची दखल थेट राज्य महिला आयोगाने घेतली आहे. टिकली लावली नाही तर प्रतिक्रिया देणार नाही या भुमिकेसंदर्भात स्पष्टीकरण भिडे यांनी तात्काळ द्यावं अशी नोटीसच पाठवली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीटरवरुन हे पत्र शेअर केलं आहे.
रुपाली चाकणकर यांनी ट्वीट केले आहे की,’साम टीव्हीच्या महिला पत्रकाराला तु टिकली लावली नाही म्हणून तुझ्याशी बोलणार नाही असे सांगत त्या महिलेचा आणि पत्रकारितेचाही अपमान करणार्या संभाजी भिडेंचा निषेध आहे. याआधी ही महिलांना हीन समजणारी, तुच्छतादर्शक वक्तव्य त्यांनी वारंवार केली आहेत त्यांची मनोवृत्ती यातून दिसून येते.’
साम टीव्हीच्या महिला पत्रकाराला तु टिकली लावली नाही म्हणून तुझ्याशी बोलणार नाही असे सांगत त्या महिलेचा आणि पत्रकारितेचाही अपमान करणार्या संभाजी भिडेंचा निषेध आहे.
याआधी ही महिलांना हीन समजणारी, तुच्छतादर्शक वक्तव्य त्यांनी वारंवार केली आहेत त्यांची मनोवृत्ती यातून दिसून येते.1/2 pic.twitter.com/fVmxNdMivo— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 2, 2022