बिहारमध्ये भर दिवसा मॉडेलवर गोळीबार, टिक-टॉक स्टार मोना रायची प्राणज्योत मालवली

पाटणा : बिहारमध्ये प्रसिद्ध मॉडेल मोना रायचा मृत्यू झाला आहे. मोनाची गेल्या पाच दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरु होती. पण मोनाचा मृत्यू झाला. मोनावर पाच दिवसांपूर्वी अज्ञात आरोपींनी गोळीबार केला होता. तिच्या हत्येमागील नेमकं रहस्य काय होतं? ते अद्याप उलगडलेलं नाही. मोनाच्या मृत्यूमागे काहीतरी मोठं रहस्य दडल्याची चर्चा परिसरात आहे. पण पोलीस अद्याप एकाही आरोपीला पकडू शकलेले नाहीत.

बिहारची राजधानी असलेल्या पाटणा शहरात मंगळवारी (12 ऑक्टोबर) भयानक घटना घडली. भर दिवसा बाईकवर आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी 32 वर्षीय महिला मॉडेल अनिता देवी उर्फ मोना रॉय हिच्यावर गोळ्या झाडल्या. संबंधित घटना ही शहरातील राजीव नगर पोलीस ठाणे क्षेत्रातील रामनगरी येथील बसंत कॉलनीत घडली.

गोळीबारानंतर आरोपी पसार झाले. यावेळी मोना राय सोबत तिची मुलगी देखील होती. तिने आरडोओरड केल्यानंतर मोना रायला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मोनाची गेल्या पाच दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरु होती. मात्र, आज (17 ऑक्टोबर) पहाटे मोनाची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली. मोनाच्या मृत्यूसोबत अनेक रहस्य दफन झाल्याची चर्चा सुरु आहे.

मोना राय ही टिक-टॉक स्टार होती. तिला टिक-टॉकवर चांगली प्रसिद्धी मिळाली. याशिवाय मोनाने अनेक भोजपुरी अल्बममध्ये काम केलं आहे. याशिवाय गेल्या एक वर्षांपासून ती मॉडेलिंग क्षेत्रात आपलं नशिब आजमत होती. तिचा पती हा एका खासगी कंपनीत काम करतो. पण आपली कुणासोबतही दुश्मनी नाही, अशी प्रतिक्रिया पतीने दिली आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर खुलासा करावा, अशी मागणी पीडितेच्या पतीने केली आहे.

विशेष म्हणजे घटनेला 5 दिवस उलटून गेल्यानंतरी पोलिसांनी अद्याप कुणाला अटक केलेली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.