नवी दिल्ली – तिहार तुरुंगातील एका कैद्याने कारवाईच्या भीतीने आपला मोबाईल गिळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (5 जानेवारी) घडली. तुरुंग अधिकारी संदीप गोयल यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, तिहार एक क्रमांक तुरुंगातील एका कैद्याने मोबाईल गिळला.
शोधासाठी आमचे कर्मचारी त्याच्याकडे पोहोचले असता त्याने मोबाइल गिळला. उपचारासाठी या कैद्याला डीडीयू रुग्णालयात पाठवण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती ठीक आहे. मात्र मोबाईल अजूनही पोटातच आहे. डाॅक्टर शस्त्रक्रीया करून मोबाईल बाहेर काढणार आहेत.