बेपत्ता पोलीस कॉन्स्टेबल सापडला तिहार तुरुंगात

संग्रहित छायाचित्र.....

मीरत -आपला एक पोलीस कॉन्स्टेबल पाच महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे उत्तर प्रदेशातील पोलीस प्रशासनाच्या लक्षात आल्यावर त्याचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने केलेल्या चौकशीत बेपत्ता कॉन्स्टेबल तिहार तुरुंगात आजन्म तुरुंगवासाची शिक्षा भोगत असल्याची माहिती मिळाली.

कंवरपाल सिंग असे कॉन्स्टेबलचे नाव असून नोव्हेंबर महिन्यात घेतलेल्या दीर्घ रजेनंतर तो सेवेत दाखल झाला नाही. 22 मे 1987 रोजी घडलेल्या मीरतमधील हाशीमपुरा हत्याकांडांतील तो आरोपी होता. या प्रकरणी सिंग याला दिल्ली उच्च न्यायालयाने 31 ऑक्‍टोबर 2018 रोजी 15 जणांसह आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसेच 22 नोव्हेंबरपूर्वी शरणागती पत्करण्याचे निर्देश दिले होते.

15 नोव्हेंबरपासून तो दीर्घ रजेवर होता. त्यामुळे तीन महिन्यांनंतरही तो सेवेत रूजू झाला नाही. सेवेत रूजू झाला नसल्याने 1 एप्रिलला त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तसेच त्याची माहिती मिळवण्यासाठी विभागीय समिती स्थापन करण्यात आली.चौकशीत हाशीमपुरा हत्याकांडप्रकरणी सिंग तिहार कारागृहात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असल्याचे उघड झाले. सिंग न्यायालयासमोर हजर झाल्यानंतर त्याला तिहार कारागृहात पाठवण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)