कामशेत – करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामशेत ग्रामपंचायत व व्यापारी असोसिएशनकडून गुरुवार, शुक्रवार असा दोन दिवस कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला कामशेतमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत.
कामशेत ही मावळातील प्रमुख बाजारपेठ तसेच परिसरातील खेड्यांचे मुख्य ठिकाण असल्याने लॉकडाऊनच्या काळातदेखील खेडेगावातील नागरिक किराणा दुकान, भाजी व बॅंकेत गर्दी करत होते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कामशेत ग्रामपंचायत व व्यापारी असोसिएशन यांनी गुरुवारी व शुक्रवारी कामशेत बाजारपेठेतील दवाखाने, मेडिकल व दूध वघळता सर्व किराणामाल व भाजीची दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला कामशेतमधील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे कामशेत बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला.