पुणे : शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात 

पुणे: राज्यात सुरु असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला काही शहरांमध्ये हिंसक वळण लागले आहे. सोमवारी चाकण येथेही हिंसक घटना घडल्या. पुणे शहरातील विविध भागातही आंदोलने सुरु आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर शहरात सोमवारी दुपारनंतर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, खबरदारी म्हणून स्थानिक पोलिसांना अर्लट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस सह आयुक्त रवींद्र कदम यांनी दिली.
राज्यातभरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलने केली जात आहेत.

अनेक शहरांमध्ये आंदोलनादरम्यान हिंसक वळण लागले आहे. शासकीय वाहने तसेच पोलिसांवर दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. सोमवारी पुणे जिल्ह्यातील खेड, चाकण भागात आंदोलन होते. त्यादरम्यान चाकण आंदोलनाला दुपारी हिंसक वळण लागले. पोलिसांची वाहने पेटवून देण्यात आली. तर, बसेसवर दगडफेक करून रस्त्यांवर टायर जाळण्यात आले. त्यानंतर पोलिसांकडून खबरदारी म्हणून 144 नुसार संचारबंदी करण्यात आली. आंदोलन चिघळल्याने जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता. त्यापार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांकडूनही दुपारनंतर खबरदारी म्हणून शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच, स्थानिक पोलिसांना अर्लट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महत्वाचे रस्ते तसेच चौकांमध्ये पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)