1 ठार, 4 जखमी
अनंतपुरम- आंध्रप्रदेशातील अनंतपुरम जिल्ह्यामध्ये तेलगू देसम आणि वायएसआर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू झाला, तर अन्य चौघे जण जखमी झाले आहेत. बाथलपल्ली मंडल येथील पटायपुरम या गावामध्ये बहुतेक सर्व नागरिक हे एकाच समुदायाचे आहेत. तर बहुतेक जण वायएसआर कॉंग्रेसचे पाठीराखे आहेत. तर काही जण तेलगू देसम पार्टीचे समर्थक आहेत.
आंध्रमध्ये तेलगू देसमची सत्ता असताना या गावात अंगणवाडीच्या इमारतीला मंजूरी मिळाली होती. त्यासाठी एक छोटी भिंतही बांधली गेली होती. मात्र या जागेवरून काही वाद सुरु होते. त्यामुळे अंगणवाडीचे बांधकाम दिडवर्षापासून थांबवले गेले होते. याच जागेच्या मालकीवरून दोन गटांमध्ये शनिवारी जोरदार हाणामारी झाली. त्यामध्ये तेलगू देसम आणि वायएसआर कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या हाणामारीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर अन्य चौघेजण जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणाबाबत् एफआयआर दाखल करून घेतला आहे.