बॉलिवूडमधील एन्ट्रीबाबत टायगरचा अनन्या पांडेला सल्ला

करण जोहरचा “स्टुडंट ऑफ द इयर 2′ 10 मे रोजी रिलीज होणार आहे. टायगर श्रॉफच्या बरोबर अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या दोघींबरोबर टायगर रोमान्स करताना दिसणार आहे. अनन्याचा हा बॉलिवूडमधील पहिला सिनेमा असणार आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआगोदर टायगरने तिला घाबरवणारा एक सल्ला दिला होता.

टायगरने हा सल्ला दिला तेंव्हा त्याचा “हिरोपंती’ नुकताच रिलीज झाला होता आणि अनन्या तेंव्हा अगदी 16 वर्षांची होती. तिच्या आईने करिअरबाबत टायगरचा सल्ला घेण्यासाठी तिला सुचवले होते. तेंव्हाच टायगरने तिला घाबरवले होते, “बॉलिवूडमध्ये ऍक्‍ट्रेस बनलीस तर कधीही आईस्क्रीम खाता येणार नाही. ट्रेनिंगसाठी सकाळी 4 वाजता उठावे लागते.’ असे टायगरने तिला सांगितले. हे ऐकून अनन्या घाबरूनच गेली होती.

लहानपणापासून तिला ऍक्‍ट्रेसच बनायचे होते. वडील चंकी पांडे ऍक्‍टर असल्यामुळे आपणही ऍक्‍ट्रेस बनावे असे तिला वाटत होते. पण स्टारडम स्वतःहून आपल्याकडे चालत येईल, असे तिला वाटत नव्हते. घरच्यांनीही कधी तिच्यावर दबाव आणलेला नव्हता. जर सिनेमात काम करायचे असेल, तर ऑडिशन दे असेच तिला तिच्या आई-वडिलांनी सांगितलेले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.