बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफने सोशल मीडिया अकाऊंटवर एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवरील या व्हिडीओत टायगर श्रॉफ हा तब्बल 220 किलो वजन उचलून हार्ड वर्कआऊट करत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसत आहे.
यासोबत त्याने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात टायगर लोवर आणि ब्लॅक कलरच्या बनियानमध्ये दिसत आहे. या फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “एक्सक्यू द वार क्राइज. 220 किलो वजनाचा अनुभव घेतला.’ यावर टायगरची मैत्रीण दिशा पाटणीने एक इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. दुसरीकडे त्याच्या आईने त्याला “पागल’ म्हटले आहे.
View this post on Instagram
Throwback to throwing around some weight…220 kgs. Bodyweight at the time – 75 kgs
दरम्यान, टायगर श्रॉफ अखेरच्या वेळी “बागी 3′ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धम्माल केली होती; परंतु अचानक लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने हा चित्रपट अर्ध्यावरच बंद करण्यात आला.
View this post on Instagram