टायगर श्रॉफचे बॅक टू बॅक 3 धमाके

टायर श्रॉफच्या “बागी-3’ने बॉक्‍स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली होती. परंतु करोना व्हायरसमुळे अचानक चित्रपटगृह बंद करण्यात आल्याने चित्रपटाला जास्त प्रसिद्धी मिळू शकली नाही. परंतु बॉक्‍स ऑफिसवरील ओपनिंगने हे सिद्ध करून दिले की, टायगर श्रॉफने स्टार कलाकारांमध्ये आघाडी घेतली असून आपल्या ऍक्‍शनच्या मदतीने तो चाहत्यांना चित्रपटगृहात आणू शकतो.

आता टायगर पुन्हा वापसी करण्यास सज्ज झाला असून तो बॅक टू बॅक 3 धमाके करणार आहे. यात टायगरच्या “गणपत’, “हिरोपंती-2′ आणि “रॅम्बो’ या चित्रपटांचे प्लॅनिंग तयार झाले आहे.

सर्वात प्रथम टायगर हा “गणपत’चे शूटिंग सुरू करणार आहे. विकास बहल द्वारा दिग्दर्शित चित्रपटात टायगर हा एका बॉक्‍सरची भूमिका साकारत आहे. यासाठी त्याने ट्रेनिंगही सुरू केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग संपताच तो “हीरोपंती-2’चे शूटिंग करणार आहे. हा एक स्टाइलिस्ट चित्रपट असणार आहे. याचे शूटिंग पुढील वर्षी एप्रिलमध्ये सुरू होण्याची शक्‍यता आहे.

टायगरने यापूर्वीच “रॅम्बो’ची घोषणा केली होती. परंतु अद्याप त्याची सुरुवातही झालेली नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन आता रोहित धवन करणार आहे. यात पुन्हा एकदा टायगर हा आपल्या ऍक्‍शनचा जलवा दाखविणार आहे. हा एक बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2021च्या अखेर होण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.