आपल्या ऍक्शनपॅक्ड रोलसाठी आणि स्टंटसाठी प्रसिद्ध असलेल्या टायगर श्रॉफनेही आता संगीताच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. आपल्या आगामी अनबिलीव्हेबल नावाच्या सिनेमासाठी त्याने पार्श्वगायन केले आहे. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्यावेळचा एक व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबत “अन बिलीव्हेबल’चे पोस्टर देखील त्याने शेअर केले आहे.
आपल्याला नेहमीच आपल्या स्वतःवर चित्रीत होणाऱ्या गाण्याचे गायन करण्याची इच्छा होती. मात्र प्रत्यक्षात कधीही गाण्याचे धाडस मात्र झाले नव्हते. मात्र या लॉकडाऊनच्या काळात खूप प्रयत्न करून अखेर ही इच्छा पूर्ण केली. आता काही तरी नवीन शोधून काढल्यासारखे वाटते आहे, असे टायगरने आपल्या पोस्टबरोबरच्या मेसेजमध्ये म्हटले आहे.
View this post on Instagram
हे गाणे म्हणजे अगदी “अनबिलीव्हेबल’ अनुभव होता, असे त्याने म्हटले आहे. त्याने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अगदी फॉर्मल ड्रेसमध्ये आणि डोळ्यांवर सनगॉगल लावलेला टायगर हातात माईक घेऊन गाण्याचे रेकॉर्डिंग करत असल्याचे दिसते आहे.
View this post on Instagram
लॉकडाऊनच्याच काळात “अनबिलीव्हेबल’चे गाणे त्याला सूचले होते, असेही त्याने सांगितले. बिग बॅंग म्युझिकची निर्मिती असलेल्या या गाण्यावर स्वतः टायगर थिरकताना दिसणार आहे. या सिनेमाचा टीझर लवकरच रिलीज होणार आहे.
View this post on Instagram