मुंबई – ‘बागी’ आणि ‘बागी 2’ चित्रपटातून धमाकेदार अॅक्शन सिन करत झळकलेला बॉलिवूडचा शेअर म्हणजेच अभिनेता ‘टायगर श्रॉफ’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस उतरला आहे. नुकतंच बागी फ्रांचायजीतील ‘बागी 3’ चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ज्यात टायगरचा पुन्हा एकदा जबरदस्त अॅक्शन अवतार अवतारात दिसला.
दरम्यान, आता ‘बागी 3’ मध्ये 80 च्या दशकातली ‘तोहफा’ (1984) चित्रपटातील एक चार्टबस्टर, “एक आंख मारू तो” गाणे रिक्रिएट करण्यात आले आहे. ज्याचे मूळ गाणे बप्पी लहरी यांनी रचले होते ज्याला किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी आवाज दिला होता.
ज्यावर आता 2020 च्या नव्या व्हर्जन भंकसवर टाइगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर, रितेश देशमुख आणि अंकिता लोखंडे थिरकताना दिसत आहे. या आइकॉनिक ट्रॅकला या चित्रपटात पुन्हा एकदा वापरण्याची कल्पना निर्माता साजिद नाडियादवाला यांची असून, बागी 3 येत्या 6 मार्चला पप्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.