दमदार अ‍ॅक्शनसाठी ‘टायगर’ सज्ज, आगामी चित्रपटाचं पोस्टर रिलीज

मुंबई – बॉलिवूडचा रियल बागी म्हणजेच अभिनेता ‘टायगर श्रॉफ’ पुन्हा एकदा आपला जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार दाखवण्यास सज्ज झाला आहे. ‘गणपत’ या आपल्या आगामी चित्रपटातून टायगर लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. टायगर सिनेसृष्टीत खासकरून अ‍ॅक्शन सीनसाठी ओळखला जातो.

नुकतंच टायगरने आपल्या इंस्टाग्रामवर गणपत चित्रपटाचे ऑफिशल पोस्टर शेअर केले आहे. विकास बहल द्वारा दिग्दर्शित गणपत चित्रपटात टायगर एका बॉक्‍सरची भूमिका साकारत आहे.

शेअर केलेल्या पोस्टरमध्ये पुन्हा एकदा त्याचा अॅक्शनपॅक अवतार पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या मोशन पोस्टरमध्ये टायगरचा एक डायलॉग सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. “जब अपून डरता हैं ना, तब अपून बहोत मारता हैं” असा डायलॉग टायगर म्हणताना दिसत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.