बारामतीत बिबट्या सीसीटीव्हीत कैद  

बारामती : कटफळ येथील बाऊली इंडिया बेक्स अँड स्वीटस कंपनीच्या परिसरात सोमवारी (दि. ९) रोजी पहाटे बिबट्या दिसला. या बिबट्याची छबी कंपनीच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. कंपनीच्या परिसरात बिबट्याचा वावर होत असल्याची बातमी समजताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा शोध घेतला मात्र त्यांना या ठिकाणी बिबट्या आढळून आला नाही. तसेच सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता पायाच्या ठशांवरुन तो बिबट्या असण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे. तर कंपनीच्या मागील बाजुने तो निघुन गेल्याचे देखील सांगितले आहेव  . या घटनेनंतर वन विभागाने संबंधित ग्रामस्थांना समूहाने राहत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.