गोंदिया – जिल्ह्यातील दासगाव बीट, गोंदिया वनपरिक्षेत्रामधील कोहका- भानपूर परिसरात वाघाचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला. मृत नर वाघ टी 14 वाघिणीचा अंदाजे 20 महिन्यांचा बछडा आहे. टी- 14 वाघीण आपल्या बछड्यांना घेऊन नागझिराच्या पूर्व भागात राहायची.
काही दिवसांआधी हा बछडा दुसऱ्या मोठ्या नर वाघाच्या भीतीने वेगळया क्षेत्रात स्थलांतर झाल्याचे समजले होते. स्थळाची संपूर्ण पाहणी करून मृत वाघाला कुडवा येथील वन विभागाच्या उद्यान परिसरात आणून शवविच्छेदन केले. प्रथमदर्शी वाघ इन्फेक्शनने मृत झाल्याचे निदर्शनात आले. त्याचे अवयव प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.