टायगर आणि दिशा पटणी केवळ मित्र- जॅकी श्रॉफ

टायगर श्रॉफ आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा पटणी यांच्या अफेअरची चर्चा बॉलीवूडमध्ये खूप दिवसांपासून सुरू आहे. कधी त्यांच्या ब्रेकअपची बातमी येते तर कधी टायअप झाल्याचे समजते. टायगरचे वडील जॅकी श्रॉफ यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

सलमानच्या राधेमध्ये जॅकी आणि दिशा आहे. “टायगर आणि दिशा हे चांगले मित्र आहेत. ते दोघेही एकमेकांच्या बरोबर आनंदी असतात.

दोघांचेही कुटुंबीय याला साक्षीदार आहेत’, असे जॅकीने म्हटले आहे. राधेच्या सेटवर दिशा जॅकीला उद्देशून काय हाक मारते, असे विचारल्यावर, ती आपल्याला सर म्हणते. फार कमी वेळेला ती अंकल म्हणते, असे जॅकीने सांगितले.

दोन्ही कुटुंब मिलिटरी शिस्त पाळणारे आहेत त्यामुळे तीदेखील शिस्त मोडणार नाही. आतातरी टायगर आणि दिशामधील नातं याबाबतची चर्चा बंद होईल अशी अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.