“टायगर 3’चे शूटिंग मार्चपासून सुरू

सलमानचा “राधे’ गुंडाळला गेला अशी चर्चा मध्यंतरी सुरू झाली होती. मात्र, सलमानने नेहमीप्रमाणे यावर्षीच्या ईदला “राधे’ धुमधडाक्‍यात रिलीज केला जाईल, असे मंगळवारी जाहीर करून टाकले. “राधे’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाऊ नये, अशी विनंती त्याला वितरकांनी केली होती. त्यानुसार “राधे’ थिएटरमध्येच रिलीज केला जाईल, असेही सलमान म्हणाला आहे.

आता तर सलमान “राधे’ नंतरच्या प्रोजेक्‍टचीही तयारी करायला लागला आहे. सध्या तो महेश मांजरेकर दिग्दर्शित “अंतिम’चे शूटिंग करतो आहे. “अंतिम’मध्ये त्याच्याबरोबर आयुष शर्माही आहे. सध्या “अंतिम’ चे शूटिंग पाचगणीमध्ये सुरू आहे. हे शूटिंग फेब्रुवारीमध्ये संपेल. त्यानंतर सलमान “टायगर-3’चे शूटिंग करणार आहे, असे समजले आहे.

सप्टेंबरपर्यंत “टायगर-3′ चे शूटिंग देखील संपण्याची शक्‍यता आहे. टायगर अर्थात अविनाश सिंह राठोडच्या रोलमध्ये सलमान पुन्हा एकदा दिसणार आहे. याशिवाय शाहरुख खानचा लीड रोल असलेल्या “पठाण’मध्येही सलमान काम करणार आहे.

आदित्य चोप्राची निर्मिती असलेल्या “टायगर-3’चे डायरेक्‍शन सिद्धार्थ आनंद करणार आहे. म्हणजे या वर्षी दिवाळीमध्ये अ”टायगर-3’ची मजा सलमानच्या फॅन्सना मिळू शकते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.