चाहत्यांना स्वस्त दरात तिकिटे

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील सामने जास्तीत जास्त चाहत्यांनी पाहावेत यासाठी अत्यंत स्वस्त दरात तिकिटे उपलब्ध करण्याचे जाहीर केले आहे. ही चांगली बातमी असली तरी प्रमुख खेळाडुंनी मानधनाच्या मुद्‌द्‌यावरून संप केल्यामुळे बांगलादेश संघ हा दौरा करणार का याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी विश्‍वविजेतेपद स्पर्धेत अव्वल स्थान मिळवत 240 गुणांची नोंद केली आहे. आता संघ पुढील महिन्यात सुरु होत असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. 3 नोव्हेंबरपासून पहिल्या टी-20 सामन्याने या मालिकेला सुरुवात होत आहे.

बांगलादेश विरोधात मायदेशात होत असलेल्या मालिकेत चाहत्यांना फक्त 50 रुपयांमध्ये सामने पाहायला मिळणार आहेत. 22 ते 26 नोव्हेंबरमध्ये कोलकत्यात पहिला कसोटी सामना होणार आहे. यासाठी केवळ 200, 150, 100 आणि 50 अशा किमतीच्या तिकीट ठेवण्यात आल्या आहेत.

त्यामुळे प्रत्यक्ष मैदानात हजेरी लावून सामना पाहणाऱ्यांसाठी कमी किमतीची तिकिटे उपलब्ध होणार आहेत. या मालिकेत 3 टी-20 आणि 2 कसोटी सामन्यांचा समावेश आहे. टी-20 मालिकेची सुरुवात 3 नोव्हेंबरपासून होणार आहे. बांगलादेशविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची आज होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.