वॉशिंग्टन – अमेरिकेने टीक-टॉक या चिनी व्हिडीओ ऍपला बंदी घातली आहे, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या बंदी आदेशाला कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय टिक-टॉक कंपनीने घेतला आहे.
90 दिवसांच्या आता अमेरिकेतील सर्व व्यवहार बंद करण्याचा आदेश टिक-टॉकला देण्यात आला आहे. तथापि त्यात जी कारणे देण्यात आली आहेत त्याच्याशी आम्ही असहमत आहोत असे त्यांनी म्हटले आहे.
आम्ही कायद्याचे कोणतेही उल्लंघन केलेले नाही, या बंदी आदेशाविषयी आम्ही प्रशासनाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण आमची कोणतीही बाजू ऐकून न घेता आमच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे असे टिक-टॉक चे म्हणणे आहे.
आमच्या बाबतीत अमेरिकेचे जे आक्षेप होते ते दूर करण्यासाठी आम्ही जवळपास एक वर्षभर प्रयत्न करीत होतो. पण तरीही आमच्या विरोधात अत्यंत आणिबाणीच्या कलमांचा वापर करून बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे आता आम्ही न्यायालयातच आमच्यावरील अन्यायाला दाद मागू असेही टिक-टॉकने म्हटले आहे.