नवी दिल्ली – दिल्लीत हनुमान जयंतीच्या शोभायात्रेवर दगडफेक झाल्याचे बोलले जात असल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. शोभायात्रेवर झालेल्या या हल्ल्यात काही लोकांसह अनेक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याची माहिती येत आहे. अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचेही वृत्त आहे. जहांगीरपुरी या ठिकाणी ही घटना घडली आहे.
हनुमान जयंतीनिमित्त मिरवणूक काढली जात असताना हा हिंसाचार सुरू झाला आणि बघता बघता अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. सध्या येथे तणावाचे वातावरण असून, जे व्हिडिओ समोर आले आहेत त्यात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे सांगण्यात आले. मिरवणुकीवर दगडफेक केल्याचीही बातमी आले. दरम्यान, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आला नसून पोलिसांनीही काही बोलण्यास नकार दिला आहे.