हल्ल्यामध्ये एक सुरक्षा रक्षक जखमी
नवी दिल्ली – देशात 2019 लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून जोरदार सुरवात झाली. तर, काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पश्चिम बंगालच्या भाजप पक्षाच्या उमेदवार ‘भारती घोष’ यांच्या गाडीवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. भारतीय पोलिस सेवेचे माजी अधिकारी भारती घोष केशपूर मधील मतदान केंद्रावर जात असताना हा हल्ला झाला.
West Bengal: Vehicles in BJP Candidate from Ghatal, Bharti Ghosh’s convoy vandalized. BJP has alleged that TMC workers are behind the attack pic.twitter.com/xdsJNkKhV8
— ANI (@ANI) May 12, 2019
स्थनिक नागरिकांनी घोष यांच्यावर दगड फेक करत हा हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये एक सुरक्षा रक्षक जखमी झाला असून, घोष यांची गाडी देखील फोटून टाकली आहे. पश्चिम बंगालमध्ये आज, आठ जागांसाठी मतदान होत आहे. भरती घोष यांच्यावर यापूर्वी सुद्धा हल्ला करण्यात आल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले.