वत्सलादेवी देसाई शिष्यवृत्ती योजनेतून अर्चना यमकरला संपूर्ण शैक्षणिक मदत

समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली पत्रकाद्वारे माहिती

सणबूर – गवळीनगर (कोकीसरे) ता. पाटण येथे पंधरा वर्षापूर्वी चुलीच्या निखाऱ्यात दोन्हीही हाताची बोटे जळून खाक झालेल्या अर्चना यमकर ही इयत्ता दहावीचे पेपर मोठ्या जिद्दीने आपल्या दोन्ही मनगटामध्ये पेन धरुन लिहीत आहे. तिची शिक्षणाची असणारी तळमळ पाहून दहावीनंतरच्या तिच्या पदवीपर्यंतच्या संपूर्ण महाविद्यालयीन शिक्षणाचा भार आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कै. सौ. वत्सलादेवी देसाई यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती योजनेमधून पेलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.

आ. शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पाटण मतदार संघातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या आज्जी कै. सौ. वत्सलादेवी देसाई यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. या शिष्यवृत्ती योजनेमध्ये दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीची निवड करुन तिच्या पदवीपर्यंतच्या महाविद्यालयींन शिक्षणाचे पालकत्व स्विकारण्यात येत आहे. ही योजना गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. या योजनेचा अनेकांना लाभ झाला आहे.

मोरणा विभागातील डोंगरी भागामध्ये वसलेल्या गवळीनगर (कोकीसरे) ता. पाटण या लहानशा लोकवस्तीमध्ये सुमारे पंधरा वर्षापूर्वी अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या अर्चना यमकर हिचे आईवडील तिला सोडून मजुरीकरीता घराबाहेर गेले असताना चुलीच्या निखाऱ्यात तिची दोन्हीही हाताची बोटे जळून खाक झाली. लहानपणापासून ती गंभीर दुखापत घेऊन तसेच तिच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखिची असतानाही एवढ्या कठीण परिस्थितीत ती शिक्षण घेत आहे. हाताला बोटे नसतानाही दहावीपर्यंतचे शिक्षण तिने पूर्ण केले आहे.

सध्या दहावीचे पेपर ती आपल्या दोन्ही मनगटामध्ये पेन धरुन लिहीत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. यातून तिची शिक्षणाची तळमळ दिसून येते. अशाच शिक्षणाची आवड आणि तळमळ असणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या शिक्षणाकरीता कै. सौ. वत्सलादेवी देसाई शिष्यवृत्ती योजना एक आधार म्हणून काम करीत आहे. आ. देसाई यांनी अर्चना हिचे दहावीचा पेपर संपल्यानंतर तिच्या आईची भेट घेवून तिला पुढील आयुष्याकरीता या योजनेच्या माध्यमातून सर्वोत्तोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)