आमदार दिलीप मोहिते यांच्या प्रयत्नातून चांडोली, आळंदी ग्रामीण रुग्णालयात ‘रेमडेसिवीर’ उपलब्ध

-रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – खेड तालुक्यातील करोना रुग्णांना वेळेत उपचार व्हावेत आणि अत्यवस्थ रुग्णांना रेमडीसिवीर औषध उपलब्ध व्हावेत यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी संपर्क करून चांडोली ग्रामीण रुग्णालय, आळंदी ग्रामीण रुग्णालयात तत्काळ  रेमडीसिवीर औषधसाठा उपलब्ध करण्यात आला असल्याची माहिती आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली.

खेड तालुक्यात करोनाचा संसर्ग वाढला आहे. प्रशासनाकडून उपाययोजना सुरु आहेत बाधित रुग्णांना वेळेत उपचार व औषध साठा मिळावा यासाठी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे, डॉ राजेश देशमुख  यांच्याशी संपर्क करून मदतीची मागणी केली. आरोग्य मंत्री टोपे यांनी चांडोली ग्रामीण रुग्णालयात २०० व आळंदी ग्रामीण रुग्णालयात १०० रेमडीसिवीर औषध तात्काळ उपलब्ध करून दिले आहे. याबरोबरच तालुक्यातील मेडिकलमध्ये रेमडीसिवीर औषध तात्काळ उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सांगितले.

तालुक्यात गेल्या काही दिवसात करोना बाधित व्यक्तीची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह प्रशासनावर ताण आला आहे. नुकतीच राज्याच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी भेट देऊन आरोग्य मंत्र्यांना तालुक्याचा आढावा दिला होता. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन समस्या जाणून घेतल्या होत्या. आज आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ राजेश  देशमुख यांच्याशी संपर्क साधून रेमडीसिवीर औषध, आरोग्य विभागात काम करणारे डॉक्टर, कर्मचारी आदी सुविधा तात्काळ उपलब्ध करण्याची मागणी केली.

तालुक्यात करोना बाधितांची संख्या वाढत असून त्यांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा राजकारण बाजूला ठेवून मदत करावी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढे येऊन तालुक्यातील रुग्णांना सेवा द्यावी, असे आवाहन  आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.