आमदार महेश लांडगे : शांताई स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
चिंबळी – कुठलीही संस्था सुरू करायची असेल तर पैसा व वेळ लागतो. तर समाजामध्ये राहून समाजकार्य केले तर नावलौकीक राहून प्रतिष्ठा व मानमर्यादा राहते, असे प्रतिपादन भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.
चिंबळी फाटा (ता. खेड) येथील जैद पाटील एज्युकेशन सोसायटी संचालित शांताई मेमोरियल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने शांताई लॉन्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या आठव्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी आमदार लाडंगे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाचे पूजन, दीपप्रज्वलन व राष्ट्रगीताने करण्यात आली.
याप्रसंगी शांताई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय जैद, अनुराग जैद, अभिषेक जैद, राजश्री जैद, मधुकर गलांडे, मयूर मळेकर, विष्णूपंत नेवाळे, तुकाराम होले, निलेश नेवाळे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळशेठ ठाकूर, माजी सभापती विलास कातोरे, संचालक विनायक घुमटकर, माजी उपसरपंच हेमंत जैद, ज्ञानेश्वर कड, सदस्य समीर जैद, गौतम कांबळे, माजी सभापती चंद्रकात इंगवले, पोलीस पाटील मयुरी बनकर, विलास हाडवळे, रमेश बाठे, प्रशांत जैद, पंडित कड आदि मान्यवरांच्या हस्ते सामाजिक कार्य करणाऱ्या 20 तरूणांना “युवा रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्ष व प्रशस्ती पत्रक देऊन महिलांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी एकदंताय वक्रतुंडाय गौरी…, लुंगी डान्स, मल्हार मल्हार…, झुम्बा का सजदा…, कोळीवाड्याची शान, भुमरो भुमरो…, शंकरा शंकरा…, ताल से ताल मिला…, भारत हमको जान से… आदि गाणांवर पाल्याला थिरकता पाहून पालक थक्क झाले होते. तर कराटे, ड्रामा फॅशन शोद्वारे उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव स्वाती जैद यांनी, सूत्रसंचालन प्राजक्ता कांबळे व निलम जगताप यांनी तर प्राचार्य प्रिया बवले यांनी आभार मानले.