अनुष्का शर्माच्या ‘पाताल लोक’ वेबसीरिजचा थरारक टीजर आउट

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची ‘पाताल लोक’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रहस्य, ड्रामा आणि थरार असा त्रिवेणी संगम या वेबसीरिज मध्ये दिसून येणार आहे.

‘पाताल लोक’ या वेबसीरिजच्या माध्यमातून अनुष्का वेबसीरिजच्या क्षेत्रात पदार्पण करत. नुकतंच या वेबसीरिजचा ऑफिशल टीजर प्रदर्शित झाला असून, ही सीरिज प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर पुढील महिन्यात 15 मेपासून पाहता येणार आहे.

दरम्यान,  प्रदर्शित झालेल्या टीजरमध्ये एका शांत जगाची सफर प्रेक्षकांना घडवण्यात आली आहे. त्यामुळे ही वेबसीरिज प्रेक्षकांसाठी एक थरार सफर असणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.