ठाणे – बदलापूर पुन्हा एकदा एका घटनेने हादरले असून बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, बदलापूरच्या रेल्वे स्थानकात संध्याकाळी 6 वाजता हा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या संबंधित एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर वायरल झाला आहे. ( firing in Badlapur railway station)
प्राथमिक माहितीनुसार, बदलापूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 3 ही घटना घडली. संध्याकाळी 6 वाजताच्या हा गोळीबार करण्यात आला. यावेळी दोन ते तीन राऊंड फायर झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे बदलापूर रेल्वे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि सर्वांची पळापळ सुरु झाली. संबधित व्हिडीओमध्ये गोळीबार झाल्यानंतर प्रवाशांची धावाधाव पाहायला मिळत असून उपस्थित रेल्वे पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतल्याचे दिसून येत आहे. यावेळी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.