भर समुद्रात बर्निंग बोटचा थरार; सहा मच्छिमारांची सुटका

पोरबंदर : गुजरातच्या किनारपट्टीजवळ बुधवारी पहाटे बर्निंग बोटचा थरार अनुभवयास मिळाला. भर समुद्रात एका नौकेला अचानकपणे आगीने घेरले. त्यानंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य हाती घेऊन त्या नौकेतील सहा मच्छिमारांना वाचवण्यात आले.

दमण आणि दिवमधील एक नौका मासेमारीसाठी अरबी समुद्रात गेली. त्या नौकेत सात मच्छिमार होते. त्या नौकेच्या इंजिनाला गुजरातच्या पोरबंदर किनारपट्टीपासून सुमारे 25 सागरी मैल अंतरावर आग लागली. नौकेवरील डिझेलमुळे ती आग तातडीने फैलावली.

आग विझवण्यात अपयश आल्याने सर्व मच्छिमारांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या. त्यानंतर नौका समुद्रात उलटली. त्या दुर्घटनेची माहिती समजताच मदत आणि बचाव कार्यासाठी दुसरी नौका समुद्रात दाखल झाली. त्या नौकेने सहा मच्छिमारांचे प्राण वाचवले. मात्र, एका मच्छिमाराचा शोध उशीरापर्यंत लागू शकला नाही.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.