भारतीय ड्रायव्हरला अमेरिकेत तीन वर्षांचा कारावास

न्युयॉर्क – न्युयॉर्क येथे ड्रायव्हर असलेल्या भारतीय वंशाच्या एका कार चालकाला अपहरण प्रकरणी तीन वर्षांचा कारावस आणि तीन हजार डॉलरचा दंड करण्यात आला आहे.

स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या वृत्तनुसार हरबीर परमार नावाच्या 25 वर्षीय ड्रायव्हरने एका महिलेला आपल्या गाडीतून चुकिच्या रस्त्याने नेत अपहरणाचा प्रयत्न केला आणि तिने विरोध केल्यानंतर एका हायवेच्या मध्यावर तिला सोडून देत पळ काढला. सदर प्रकरणी परमार याला न्यायालयाने दोशी ठरवले असून त्याला कारावासासह दंड करण्यात आला आहे आणि त्याचे ड्रायव्हिंग लायसन्सदेखील जप्त करण्यात आले असून यापुढे तो ड्रायव्हर म्हणुन काम करु शकणार नाही.

सदर प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, एका महिला प्रवाशाने न्युयॉर्क येथून व्हाईट प्लेन या परिसरात जाण्याकरील उबेर या ऍप वरुन टॅक्‍सी बूक केली. टॅक्‍सीत बसल्यानंतर महिला प्रवाशाला झोप लागली. त्याचा फायदा घेत परमार याने प्रवाशाचे प्रवासाचे ठिकाण बदलत बोस्टन येथील ठिकाण निवडले आणि तिकडे आपली गाडी वळवली. यानंतर महिला प्रवाशाला जाग आली असता तिने परमारयाला विनंती करत गाडी पुन्हा व्हाईट प्लेन्स कडे अथवा स्थानीक पोलिस स्थानकाकडे घेण्यास सांगितले. मात्र, परमार याने त्यास नकार देत त्या महिलेला हायवेवरच उतरवले. यानंतर त्या महिलेने स्थानिक पोलिस स्थानक गाठत त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.

Leave A Reply

Your email address will not be published.