अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी

पुणे- आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग़ करणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश के.के.जहागिरदार यांनी सुनावली.
अतुल उत्तम आवळे (वय 31) असे त्याचे नाव आहे. मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अरूंधती ब्रम्हे यांनी काम पाहिले. त्यांनी चार साक्षीदार तपासले. पोलीस उपनिरीक्षक एस.एस.धुमाळ यांनी या प्रकरणाचा तपास केला. पोलीस हवालदार आर.पी.पराळे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली.

पीडित आठवीत असताना 2014 मध्ये ती आवडत असल्याचा सांगणारा कागद तिच्या बॅगेत फेकला होता. त्यावर मोबाईल क्रमांक होता. त्यावेळी तिने त्याला नकार दिला. त्यानंतर फेब्रुवारी 2016 मध्ये ती उभी असताना आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमके देत तो तिला दुचाकीवर घेऊन गेला.

माहिती नसलेल्या ठिकाणच्या बंद असलेल्या घरात नेऊन तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिचे ओपन फोटो आणि व्हिडीओ मोबाईलवर टाकल्याचे त्याने सांगितले. तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर याबबत पोलिसात फिर्याद देण्यात्‌ आली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.