तीन वर्षीय चिमुरडीची बलात्कार करून हत्या; सोशल मीडियावर न्यायासाठी कॅम्पेन 

उत्तरप्रदेश – मागील काही दिवसांमध्ये जय श्रीरामच्या घोषणेवरून आणि गोमांसावरून चांगलेच राजकरण रंगले आहे. हे विषय सोशल मीडियावरही चांगलेच ट्रेंड झाले. सध्या सोशल मीडियावर ट्विंकल शर्माच्या नावाने एक हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. या ३ वर्षीय मुलीसाठी जनतेने न्यायाची मागणी करत आहे.

उत्तरप्रदेशास्थित अलिगढमधून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर येत आहे. एका व्यक्तीने साथीदारासोबत तीन वर्षीय ट्विंकलचा बलात्कार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जाहिद आणि त्याचा मित्र अस्लम यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ३ जून रोजी ट्विंकल खेळताना जाहिदच्या दरवाजासमोर आल्यावर तिला बिस्किटाचे आमिष दिले आणि घरात बोलवले. यानंतर तिची हत्या करण्यात आली. तीन दिवस ट्विंकलचा मृतदेह घरात लपवून ठेवला. परंतु, मृतदेहातून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाल्यावर बाहेर फेकण्यात आला. केवळ १० हजार रुपयांच्या कर्जावरून ट्विंकलच्या कुटुंबीयांसोबत त्यांचा वाद झाला होता. याचा राग मनात धरून ट्विंकलची हत्या करण्यात आली.

दरम्यान, या घटनेवरून पुन्हा एकदा सोशल मीडियावर न्यायासाठी कॅम्पेन चालू केले आहे. यामध्ये हातात पोस्टर्स घेऊन मला लाज वाटते तुम्हाला असा प्रश्न विचारला आहे. कठुआ सामूहिक बलात्कारदरम्यानही सोशल मिडियावर असेच कॅम्पेन चालविण्यात आले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.