ओडिशात दरडी कोसळून तीन महिला ठार

कोरपूत – ओडिशातल्या कोरपूत जिल्ह्यात काल शुक्रवारी दरडी कोसळून तीन महिला ठार झाल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यातील पोडागुडा भागात हा प्रकार घडला. तेथील काही महिला आपल्या घरात वापरण्यासाठी डोंगर भागात मिळणारी चुनखडी आणण्यासाठी तिकडे गेल्या होत्या. त्यावेळी तेथे अचानक दरडी कोसळल्यामुळे त्या खाली त्या दबल्या गेल्या. त्यातच त्या ठार झाल्या.

मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी याप्रकरणी दुःख व्यक्‍त केले असून त्यांनी प्रत्येक महिलेच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत जे अन्य लोक जखमी झाले आहेत त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे, अशी घोषणाही मुख्ममंत्री नवीन पटनाईक यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.