“पुरंदर’साठी तीन मार्ग प्रस्तावित

पुणे – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडच्या पूर्व भागातील दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. चार तालुक्‍यांतून हा रस्ता जाणार आहे. त्याचबरोबर या रस्त्यावरून पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी तीन मार्ग प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडच्या पश्‍चिम भागातील मार्गाचे सर्वेक्षणाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. तसेच त्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली असून त्याला राज्य महामार्गाचा दर्जा मिळावा, यासाठीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यापाठोपाठ पूर्व भागातील रिंगरोडच्या सर्व्हेक्षणाचे देखील काम पूर्ण करण्यात आले आहे. हा टप्पा सुमारे 62 किलोमीटर लांबीचा असणार आहे. चार तालुक्‍यातून तो जाणार आहे. नगर स्त्यावरील मरकळपासून तो सुरू होणार असून पुणे-सातारा रस्त्यावरील वरवे बुद्रुक येथे येऊन मिळणार आहे.

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी एकूण तीन मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यापैकी एक मार्ग निश्‍चित करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारची उच्चाधिकार समितीची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. या बैठकीला पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांचे आयुक्त, पीएमआरडीएचे आयुक्त, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, जिल्हाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.

विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन तीन पैकी एक मार्ग विमानतळासाठी निश्‍चित केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)