पिंपरीत तीन वाहनांची टोळक्‍याकडून तोडफोड

पिंपरी – गाडी पार्क करण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एक टोळक्‍याने वाहनांची तोडफोड केली. ही घटना पिंपरीतील खराळवाडी परिसरात शुक्रवारी रात्री घडली.

खराळवाडी, पिंपरी येथे गाडी पार्क करण्याच्या कारणावरून भांडणे झाली. त्यातच एका वाहनाचा दुसऱ्या वाहनाला धक्‍का लागला. या कारणावरून एका टोळक्‍याने धुडगूस घालत खराळवाडी परिसरातील दोन छोटा हत्ती टेम्पो आणि एका मोटारीची काच फोडत परिसरात दहशत निर्माण केली. तसेच टोळक्‍याने धारदार शस्त्राचा वापर करी केलेल्या मारहाणीत काहीजण जखमीही झालेले आहेत. याबाबत बोलताना पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर म्हणाले, “आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यापैकी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच गुन्हा दाखल करण्याचे कामही सुरू आहे. आरोपींच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल.

गेल्या तीन वर्षापासून शहरात दर 15 दिवसांनी विविध ठिकाणी टोळक्‍यांकडून वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार घडत असून यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे. अशा घटना आवर घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.