नगर (प्रतिनिधी) – नव्याने करोनाबाधित होणार्यांची संख्या आज पुन्हा एकदा तीन हजार पार झाली आहे. तथापि, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आज चांगले असून, जिल्ह्यात तब्बल तीन हजार 65 रुग्ण आज बरे होऊन घरी गेले आहेत. नागरीकांची आणखी थोडी काळजी घेतल्यास रुग्णसंख्या पुढील आठवड्यात बर्यापैकी घटण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्यांची व्यक्त केली.
जिल्ह्यात आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 24 हजार 690 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 84 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 3 हजार 176 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 22 हजार 68 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 528, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 434 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 214 रुग्ण बाधित आढळले. त्यात जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 73, अकोले 81, जामखेड 21, कर्जत 153, कोपरगाव 29, नगर ग्रामीण 04, नेवासा 22, पारनेर 01, पाथर्डी 47, राहता 44, राहुरी 02, शेवगाव 19, श्रीगोंदा 11, श्रीरामपूर 02, कँटोन्मेंट बोर्ड 04 आणि मिलिटरी हॉस्पिटल 13 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 462, अकोले 54, जामखेड 04, कर्जत 13, कोपरगाव 78, नगर ग्रामीण 108, नेवासा 33, पारनेर 22, पाथर्डी 46, राहाता 180, राहुरी 52, संगमनेर 199, शेवगाव 23, श्रीगोंदा 05, श्रीरामपूर 73, कँटोन्मेंट बोर्ड 18 आणि इतर जिल्हा 62 आणि इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 1214 जण बाधित आढळुन आले. मनपा 80, अकोले 62, जामखेड 41, कर्जत 170, कोपरगाव 71, नगर ग्रामीण 111, नेवासा 83, पारनेर 22, पाथर्डी 48, राहाता 78, राहुरी 104, संगमनेर 27, शेवगाव 96 श्रीगोंदा 112, श्रीरामपूर 99, कॅन्टोन्मेंट बोर्ड 04 आणि इतर जिल्हा 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा 657, अकोले 146, जामखेड 79, कर्जत 190, कोपरगाव 177, नगर ग्रामीण 167, नेवासा 131, पारनेर 132, पाथर्डी 195, राहाता 352, राहुरी 106, संगमनेर 267, शेवगाव 114, श्रीगोंदा 105, श्रीरामपूर 165, कॅन्टोन्मेंट 42, मिलिटरी हॉस्पिटल 10 आणि इतर जिल्हा 27 आणि इतर राज्य 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.