श्रीनगर – काश्मीरात पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत जैश ए महंमदचे तीन दहशतवादी ठार झाले आहेत. त्यात एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे.या जिल्ह्यातील चंदगाम गावात ही चकमक झाली. हे दहशतवादी ज्या ठिकाणी लपले होते त्याची माहिती सुरक्षा जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या भागाला वेढा देऊन ही कारवाई केली.
त्यांचे अन्य कोणी साथीदार तिथे लपले आहेत काय याची माहिती सर्वत्र तपासणी करून घेतली जात आहे. काश्मीर झोनचे पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनी सांगितले की, ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून ते तिघेही जैश ए महंमद या संघटनेशी संबंधीत आहेत. त्यांच्या पैकी एक जण पाकिस्तानी नागरीक आहे.
त्यांच्याकडून एकूण तीन रायफली जप्त करण्यात आल्या आहेत त्यातील एक एके 47 आहे तर अन्य दोन रायफली एम 4 कार्बाईन्स स्वरूपाच्या आहेत.