नवी दिल्ली : रविवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दले आणि अतिरेकी यांच्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामाच्या त्रालमध्ये झालेल्या या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्याकडे सुरक्षा दलाला मोठ्या प्रमाणात दारूगोळा मिळाला आहे.
#Tral #Encounter Update: 03 #terrorists killed. #Arms & ammunition recovered. Identities& affiliations being ascertained. @JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) January 12, 2020
ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी दोन हिज्बुल मुजाहिद्दीन आणि एक दहशतवादी जैश-ए-मोहम्मद आहे. ओमर फैयाज लोणे आणि आदिल बशीर मीर हे हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी आहेत. ठार झालेल्या दहशतवाद्यांचे नांव फैशन हमीद भट आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुरक्षा दलाला त्रालच्या गुलशनपुरा भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी दक्षिण काश्मीरच्या या भागात घेराव घालून शोध मोहीम राबविली.
सुरक्षा दलाच्या शोधमोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलाने जोरदार प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.