जम्मू-काश्‍मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

राज्यात अजूनही शोधमोहिम सुरू

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सोमवारी अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी झाली. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना ठार केले. सध्या शोधमोहीम सुरू आहे. सोमवारी सकाळी लष्कराच्या 55 राष्ट्रीय रायफल आणि जम्मू-काश्‍मीर पोलिसांच्या विशेष पथकाच्या वाचीमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. यानंतर सुरक्षा दलाकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली. शोधमोहिमे दरम्यान दहशतवादी ज्या घरात दबा धरून बसले होते तिथूून सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. यानंतर सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले.

आदिल शेख आणि वसीम वानी असे ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी नावे आहेत. तर तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटली नाही. 29 सप्टेंबर 2018 रोजी पीडीपीचे तत्कालीन आमदार एजाज मीर यांच्या घरातून 8 शस्त्रे लुटण्याची जबाबदारी आदिल शेख यांच्यावर होती. यापूर्वी 15 जानेवारी रोजी डोडा जिल्ह्यात सुरक्षा दले आणि अतिरेक्‍यांमध्ये चकमकी झाली होती. या घटनेत सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याचा मृत्यू केला होता. दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम राबविली गेली पण कोणताही दहशतवादी पकडला जाऊ शकला नाही.

यापूर्वी 12 जानेवारी रोजी सुरक्षा दलांनी तीन अतिरेकी ठार केले होते. दक्षिण काश्‍मीरच्या त्रालमधील गुलशन पोरा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. उमर फयाज लोणे उर्फ हमद खान, आदिल बशीर मीर उर्फ अबू दुजना आणि फैजान हमीद अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. हे सर्व त्रलचे रहिवासी होते. ओमर आणि आदिल हिजबुल मुजाहिद्दीनच्या संपर्कात होते, तर फैजान जैश-ए-मोहम्मदच्या संपर्कात होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.