नवी दिल्ली: शनिवारी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलाने लष्कर-ए-तैयबाच्या अतिरेक्यांना पकडले आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. उत्तर-काश्मीर जिल्ह्यातील सोपोर भागातील सोपोर-कुपवाडा रोडवरील शेंगरगुंड येथे सुरक्षा दलाने या तिघांना अटक केली, अशी माहिती एका पोलिसअधिकाऱ्यांनी दिली.
मुश्ताक अहमद मीर उर्फ लश्कीरी, मुद्सीर अहमद मीर आणि अतहर शमास अशी या तिघांची नावे असल्याचे त्याने सांगितले. हे तिघेही सोपोरमधील ब्राथ कलां भागातील रहिवासी आहेत.
त्याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.