उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून तीन ठार

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका दोन वर्षांच्या चिमुकलीचा समोवश आहे. तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना ताताडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

उल्हासनगरमधील इंदिरा मार्केट परिसरातील मेमसाब अपार्टमेंटच्या दुसऱ्या माळ्याचा स्लॅब पहिल्या माळ्यावर तर पहिल्या माळ्याचा स्लॅब हा तळ मजल्यावरील हॉस्पिटलवर कोसळला. दुर्घटनेची महिती मिळताच अग्निशनम दल आणि पालिकेचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढले. दरम्यान, दुर्घटना घडलेल्या इमारतीमधील लोकांना बाहेर काढून इमारत रिकामी करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)