कराडजवळील सैदापुरात तीन सख्ख्या बहिणीचा मृत्यू

अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज

कराड –  सैदापूर ता. कराड येथील मिल्ट्री होस्टेलनजीक वास्तव्यास असलेल्या सासवे कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. आयुषी शिवानंद सासवे (वय 3 ), आस्था शिवानंद सासवे (वय 9), आरुषी शिवानंद सासवे (वय 8) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुरुवारी रात्री कुटंबीयांसमवेत एकत्रित जेवण झाल्यानंतर या आईसह या तीन मुलींना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. यामध्ये तीन मुलींना जास्त त्रास झाल्याने कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सासवे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

मृत्यू झालेल्या मुलींचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून तो पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. अन्नातून विषबाधा झाली असावी, असा पोलीसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.