पाकिस्तानातील स्फोटात तीन सुरक्षा रक्षक ठार

पेशावर – पाकिस्तानात उत्तर अझिरीस्तानच्या शेवा तालुक्‍यात एका चेक पोस्ट नजिक दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात तीन सुरक्षा रक्षक ठार झाले. या चेकपोस्ट जवळच स्फोटकांचा एक मोठा साठा दहशतवाद्यांनी लपवून ठेवला होता आणि त्यानंतर त्याचा आयईडच्या सहाय्याने स्फोट घडवला. त्यात दोन जण जागीच ठार झाले तर रूग्णालयात उपचार सुरू असताना एक सुरक्षा जवान ठार झाला, खैबर पख्तुनवा प्रांताचे मुख्यमंत्री मेहमुद खान यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

अशा घटनांतून सरकारला घाबरवण्याचा प्रयत्न कोणीही करू शकत नाही उलट आम्हाला त्यातून दहशतवाद्यांच्या विरोधात प्रखर कारवाईचीच प्रेरणा मिळते असे त्यांनी म्हटले आहे. या घटनेची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. तपास यंत्रणांनाही हा स्फोट कोणी घडवला याचे धागेदोरे अद्याप मिळालेले नाहीत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.