डी-मार्टसमोर अपघातात तीनजण जखमी

कराड -पुणे-बेंगळुरू महामार्गावरील डी मार्ट समोर एसटीने -आयशर टेम्पोला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात आज दुपारी तीनच्या सुमारास झाला. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील एक तास वाहतूक विस्कळीत झाली होती.आयशर चालक रवींद्र प्रताप सिंह (वय 34, रा.पुणे), एसटीमधील महिला वनिता प्रकाश शेळके (वय 47, रा. विरार, ठाणे) व रूपाली विकास परीट (वय 25, रा. तुजारपूर, ता. वाळवा) अशी जखमींची नावे आहेत.

घटनास्थळावरून व पोलिसांची माहिती अशी, कर्नाळा डेपोची, कर्नाळा-कोल्हापूर गाडी (एम- एच -14 बी. टी. 2261) कोल्हापूरच्या दिशेने निघाली होती. त्याचदिशेने जाणाऱ्या ट्रकने एसटीला झोला दिला.त्यामुळे एसटी चालकाचा ताबा सुटून एसटी महामार्गावरील लोखंडी दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला जाऊन कोल्हापूर वरून पुण्याकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोला(एम -एच 4 ई- एम 8711) धडकली.

या धडकेत आयशर चालक व एसटीमधील दोन महिला जखमी झाल्या. त्यांना तातडीने कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here