मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ३ जण निरिक्षणाखाली रुग्णालयात आहेत. त्यात पुणे येथील दोन तर सांगलीतील एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत ३७ प्रवाशांपैकी ३४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोना व्हायरस पासून बचावासाठी आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तेवीस हजार ३५० प्रवाश्यांची तपासणी करण्यात आली आहे. कोरोना व्हायरस बाधित भागातून आलेल्या १६६ प्रवाशांपैकी ७२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण केल्याचे टोपे यांनी सांगितले. चीन येथून येणाऱ्या सर्व प्रवाशांना भरती करण्यासह त्यांचे प्रयोगशाळेत निदान करण्याचे धोरण असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणले.
दरम्यान या विषाणूमुळे चीनमध्ये एकाच दिवसात ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक ९५ जणांचा मृत्यू चीनच्या वुहान प्रांतात झाला आहे.