नेपाळ मधील विमान दुर्घटनेत तीन जण ठार

काठमांडू – नेपाळ मध्ये एव्हरेस्ट शिखराच्या परिसरातील एका विमानतळावर एक छोटे विमान उड्डाणाच्या तयारीत असताना ते रनवे वरून घसरले आणि ते तेथे उभ्या असलेल्या हेलिकॉप्टरवर जाऊन आदळले. त्या घटनेत तीन जण ठार झाले तर अन्य चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हे विमान समिट एअरलाईन्स कंपनीचे होते. ते ज्या हेलिकॉप्टर वर जाऊन आदळले ते हेलिकॉप्टर मनाग एअरलाईन्सचे होते. या दोन्ही विमान कंपन्या एव्हरेस्ट परिसरात पर्यटकांसाठी दुर्गम भागात विमान सेवा चालवतात. जखमींना हेलिकॉप्टर मधून काठमांडुला नेण्यात आले आहे. आज सकाळी ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये त्या विमानाचा पायलट आणि पार्किंग करून ठेवलेल्या हेलिकॉप्टर जवळ उभे असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.