रायगड : रायगडमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रायगडच्या पाली खोपोली मार्गावर हा भीषण अपघात झाला. परळीजवळ कानसळ गावाजवळ एका स्कूलबसने बाईकला धडक दिल्याने हा अपघात झाला.
कसा झाला अपघात?
मृत तरुण हे बाईकवरून ट्रिपल सीट प्रवास करत होते. परळीजवळ कानसळ गावाजवळ स्कूलबसने बाईकला समोरून धडक दिली. बसने धडक देताच हे तिघेजण गाडीवरून फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तिघांचे मृतदेह जांभूळपाडा प्राथमिक केंद्रात पाठवण्यात आले. मृत तिघांची अद्याप ओळख पटलेली नसून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.