37 प्रवासी जखमी, 7 जणांना मुंबईला हलवले
मुंबई : मुंबई गोवा महामार्गावर माणगावनजीक ढालघर फाटा येथे झालेल्या अपघातात 37 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईत हलवण्यात आले आहे. तर उर्वरीत जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
रविवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मुंबईकडून दापोलीच्या दिशेने दोन टेम्पो ट्रॅव्हलर बसेस प्रवासी घेवून निघाल्या होत्या त्याचवेळी समोरून येणारया कंटेनरच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून त्याने या गाडयांना धडक दिली आहे. या अपघातात दोन्ही वाहने पलटी झाली असून त्यांचं मोठं नुकसान झाल आहे. स्थानिकांनी तातडीने धाव घेत जखमींना गाडीतून बाहेर काढले व उपचारासाठी रूग्णालयात हलवले आहे.