पुणे – करोनाबाधित देशातून आलेल्या आणखी तिघांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत दाखल झालेल्या 5 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यातील चौघांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, काही नागरिक करोनाबाधित देशातून आल्यावर त्यांना सर्दी, ताप, खोकला असतानाही उपचार घेत नाहीत. त्याबाबत आरोग्य विभागालाही माहिती देत नसल्याचे दिसून येते.
त्यामुळे राज्याचे आरोग्य बिघडू नये या विचाराने चीनमधून किंवा बाधित देशातून येणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ आरोग्य विभागाला माहिती देऊन नायडू किंवा महापालिका रूग्णालयातील विलगीकरण कक्षात तपासणीसाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.