पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात आज तीन पुरुष रुग्णांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पिंपळेगुरव, दापोडी आणि जनवाडी (पुणे) येथील हे रुग्ण आहेत.
दापोडीतील रुग्ण हा 45 वर्षांचा आहे. तर, पिंपळेगुरव आणि जनवाडी येथील रुग्ण हे अनुक्रमे 31 आणि 36 वर्षीय आहेत. रुग्णालयामध्ये सध्या एकूण 25 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर, 33 जणांना आत्तापर्यंत उपचार करून रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दापोडीतील रुग्ण हा 45 वर्षांचा आहे. तर, पिंपळेगुरव आणि जनवाडी येथील रुग्ण हे अनुक्रमे 31 आणि 36 वर्षीय आहेत. रुग्णालयामध्ये सध्या एकूण 25 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर, 33 जणांना आत्तापर्यंत उपचार करून रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे