श्रीनगर -दक्षिण काश्मीरमध्ये मंगळवारी सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे दहशतवादी संघटनांना आणखी एक हादरा बसला आहे. शोपियॉं जिल्ह्यात एका ठिकाणी दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा पथकाने दहशतवाद्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेवेळी सुरक्षा जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये तीन दहशतवादी मारले गेले.
त्यांच्याकडील दोन एके रायफली, एक इन्सास रायफल आणि काही दारूगोळा जप्त करण्यात आला. मागील काही दिवसांपासून सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांविरोधात धडक मोहिमा राबवल्या जात आहेत. त्यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाल्याने त्यांच्या संघटनांना जबर धक्के बसले आहेत.