श्रीनगर – काश्मीर खोऱ्यात बडगाम आणि शोपियां जिल्ह्यांमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले तर एक पोलिस कर्मचारी शहीद झाला आहे. बडगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एकूण दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले, त्यापैकी एकाचा नंतर रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. झनीगम गावात ही चकमक झाली.
तेथे काहीं दहशतवादी लपले असल्याची बातमी मिळाल्यानंतर एक पोलिस पथक तिकडे गेले होते. पोलिसांवर हल्ला करून तेथील दहशतवादी पळून गेले. शोपियां जिल्ह्यातील बडीगाम गावातील चकमकीत मात्र सुरक्षा पथकाला चांगले यश आले तेथे जवानांच्या गोळीबारात तीन दहशतवादी मारले गेले. ठार झालेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. ते शेजारील देशातून प्रशिक्षण घेऊन आलेल्यांपैकी असावेत असा कयास व्यक्त होतो आहे.